अजिंठा लेणी ही भारतातील प्राचीन बौद्ध परंपरा, कला, शिल्प आणि वास्तुकलेचा अद्वितीय ठेवा आहे.
२२०० वर्षांचा वारसा इ.स.पू. २ व्या शतकापासून सातवाहन व नंतर वाकाटक काळात खोदलेली ही लेणी आजही प्राचीन भारताचा इतिहास जपून ठेवतात.
बौद्ध संस्कृतीचा प्रभाव अजिंठा लेणीतील चैत्यगृह आणि विहारांचा वापर बौद्ध भिक्खू ध्यान आणि शिक्षणासाठी करत.
३० गुंफा, ३० अनोख्या कहाण्या प्रत्येक लेणीची रचना, उपयोग आणि कलाकृती वेगवेगळी आहे. काही ध्यानासाठी, काही वास्तव्य आणि काही पूजेकरिता.
रंग आणि रेषांत अजरामर कला अजिंठा लेणीतील भित्तीचित्रे ही भारतातल्या सर्वात प्राचीन व सूक्ष्म रंगकामांपैकी मानली जातात.
पद्मपाणी: बौद्ध करुणेचे प्रतीक गुंफा क्रमांक १ मधील 'पद्मपाणी' व 'अवलोकितेश्वर' ही भित्तीचित्रे सौंदर्य, करुणा आणि शांतीचे प्रतीक म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत.
दगडात कोरलेली नाजूकता अजिंठ्याच्या शिल्पांमधील नक्षीकाम, फुलांचे आकृतीबंध, बौद्ध मूर्तींची रचना ही कलाकारांच्या अचूकतेची साक्ष आहे.
निसर्गाच्या सान्निध्यातील आश्चर्य वाघुर नदीच्या काठावर वसलेली ही लेणी, निसर्ग आणि इतिहासाचा अद्वितीय मिलाफ घडवतात.
जगाने मान्य केलेला अमूल्य ठेवा १९८३ साली अजिंठा लेणींना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळाला, ज्यामुळे लेणीचे आंतरराष्ट्रीय महत्त्व अधोरेखित.
भक्तीचा इतिहास, पर्यटनाचा वर्तमान पूर्वी ध्यान आणि शिक्षणासाठी वापरली जाणारी लेणी, आज लाखो पर्यटकांना भारताच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवतात.
छत्रपती संभाजीनगर येथून बस आणखी खाजगी वाहनाने येथे पोहचता येते. लेणी दर सोमवारी बंद असते.
भारतातील तसेच परदेशातील लाखो पर्यटक अजिंठा लेणींना भेट देऊन भारतीय इतिहास, धर्म आणि कलेच्या वैभवाचा अनुभव घेतात.