चायनिज लोकांचं 'शतायुषी' रहस्य दडलंय 'या' सप्लिमेंट्समध्ये 

 चायनिज लोक त्यांच्या आहारात दोन सप्लिमेंट्सचा सर्वात जास्त वापर करतात.

एका संशोधनातून असे समोर आले आहे की चायनिज लोक त्यांच्या आहारात दोन सप्लिमेंट्सचा सर्वात जास्त वापर करतात, चला जाणून घेऊया की ते दोन सप्लिमेंट्स कोणते आहेत.

नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर आणि अमेरिकेच्या CUNY लेहमन कॉलेजच्या व्यायाम विज्ञान आणि मनोरंजन विभागाने केलेल्या संशोधनातून या सप्लिमेंटची माहिती समोर आली.

संशोधनात, १५ हजार ८७४ पैकी २ हजार ८७७ लोकं वयाचं शतक पार केलेले होते, यात २ हजार १६९ महिला आणि ७०८ पुरूष होते. त्यापैकी २३२ महिला आणि ८७ पुरुषांनी सप्लिमेंट्सचा वापर केला.

आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की यापैकी बहुतेक लोकांनी फक्त एक सप्लिमेंट घेतले, त्यानंतर दोन सप्लिमेंट्स घेतले. पहिले कॅल्शियम आणि दुसरे प्रोटीन हे सर्वात जास्त वापरले जाणारे सप्लिमेंट्स आहेत.

या दोघांव्यतिरिक्त, शंभरी पार केलेल्या लोकांमध्ये तिसरे सर्वात जास्त वापरले जाणारे सप्लिमेंट मल्टीविटामिन हे आहे. CLHLS सर्वेक्षणात कॅल्शियम आणि प्रोटीन घेण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही.

अमेरिकेतील वृद्ध लोक सहसा त्यांच्या हाडांना बळकटी देण्यासाठी कॅल्शियम घेतात. चीनमधील शंभरी गाठलेले लोक देखील याच कारणामुळे जास्त कॅल्शियम सप्लिमेंट्स घेत असण्याची शक्यता आहे.

कोविड-१९ पासून चीनमध्ये प्रोटीन पावडर मोठ्या प्रमाणात विकली जात आहे आणि लोकांमध्येही ती खूप लोकप्रिय झाली आहे.

सप्लिमेंट्सच्या वापरामुळे चीनमधील लोकांचे आयुर्मान वाढण्यास हातभार लागला आहे की हा केवळ योगायोग आहे हे स्पष्ट झाले नाही.

Click Here

Your Page!