'या' गावात मुलीच्या जन्मानंतर लावली जातात 111 रोपं...
पिपलांत्री (राजस्थान) येथील सरपंच श्यामसुंदर पालीवाल यांची लाडकी कन्या किरणचं २००६ मध्ये निधन झालं. तिच्या स्मृतीला जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी ही प्रथा सुरू केली.
या गावात आजपर्यंत ३ लाखांहून अधिक झाडे लावली गेली आहेत व परिणामी जमिनीखालील पाण्याचा स्तर वाढलाय आहे. उन्हाळा ३ - ४ अंशांनी थंड झालाय. याचबरोबर महिलांना कोरफडीच्या उत्पादनातून उत्पन्नही मिळतंय.
झाडे आणि मुली एकत्र वाढतात आणि मुली लावलेल्या त्या भावंडरूपी झाडांना राखी बांधतात.
एका वडिलांच्या दुःखातून निर्माण झालेल्या या हरितक्रांतीला, सर्वोच्च न्यायालयाकडून कौतुकाने तर राष्ट्रपतींकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.