भारतात दररोज १० हजार लोकांना श्वानांचा चावा

श्वान चावण्याची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात 

भारतामध्ये दररोज १०,००० पेक्षा जास्त लोकांना कुत्रे चावत असून, प्रत्यक्ष आकडा खूप जास्त असू शकतो. फक्त रेबीज मृत्यूंचा आकडा पाहिल्यासच ही बाब आणखी स्पष्ट होते.

२०२२ मधील रेबीज मृत्यूंसाठी सरकारने दिलेला आकडा फक्त २१ आहे. भारतीय स्रोतानुसार २०२२ मध्ये ३०५ लोक रेबीजमुळे मरण पावले. 

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, भारतात २०२२ मध्ये रेबीजमुळे १८ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनानंतर कुत्र्यांच्या चावण्याचे प्रमाण वाढले आहे.

२०१८ मध्ये हे प्रमाण ७५.७ लाख,  २०१९ मध्ये ७२.८ लाख, २०२० मध्ये ४६.३ लाख, २०२१ मध्ये १७.० लाख, २०२२ मध्ये २१.९, २०२३ मध्ये ३०.५ लाख होते.

कुत्रे अधिक चावण्याची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात आढळून आली आहे. राज्यात ही संख्या १३.५ लाख आहे. तर आंध्र प्रदेशात ६.५ लाख कुत्रा चावण्याची प्रकरणे आहेत.

तर भटक्या कुत्र्यांची संख्या सर्वाधिक उत्तर प्रदेशात आहे. उत्तर प्रदेशात २०.६ लाख, ओडिशात १७.३ आणि महाराष्ट्रात १२.८ लाख श्वानांची संख्या आहे.

१८,०००-२०,००० मृत्यू भारतात दरवर्षी रेबीजमुळे होतात, असे जागतिक आरोग्य संघटना म्हणते.

Click Here