भारतातील १० सर्वात श्रीमंत कुटुंबांची यादी जाहीर

हुरुन इंडियाने भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबांची यादी जाहीर केली आहे. 

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला सलग दुसऱ्या वर्षी या यादीत पहिले स्थान मिळाले आहे. त्यांची एकूण संपत्ती आता २८.२ लाख कोटी रुपये आहे. 

कुमार मंगलम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली आदित्य बिर्ला ग्रुप ६.५ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

जेएसडब्ल्यू ग्रुपचे सज्जन जिंदाल यांच्या नेतृत्वाखालील जिंदाल कुटुंबाने ५.७ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह तिसरे स्थान मिळवले आहे. 

ऑटोमोबाईल क्षेत्रातील मोठे नाव असलेले बजाज कुटुंब चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण संपत्ती ५.६ लाख कोटी रुपये आहे.

ऑटोमोबाईल क्षेत्रातील आणखी एक दिग्गज आनंद महिंद्रा यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत. महिंद्रा कुटुंबाची एकूण संपत्ती ५.४ लाख कोटी रुपये आहे.

टेक्नॉलॉजी क्षेत्रातील दिग्गज आयटी कंपनी HCL चे प्रमुख शिव नादर या यादीत सहाव्या क्रमांकावर आहेत. नादर कुटुंबाची एकूण संपत्ती ४.७ लाख कोटी रुपये आहे.


या यादीत मुरुगप्पा ग्रुपने सातवा क्रमांक पटकावला आहे. मुरुगप्पा कुटुंबाची संपत्ती ₹ २.९ लाख कोटी आहे. 


अजीम प्रेमजी आणि कुटुंब २.८ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह यादीत आठव्या क्रमांकावर आहेत.

वेदांता ग्रुपचे अनिल अग्रवाल ₹ २.६ लाख कोटी संपत्तीसह नवव्या आणि एशियन पेंट्सचे दानी, चोक्सी, वकील ₹ २.२ लाख कोटी संपत्तीसह दहाव्या क्रमांकावर आहेत.

Click Here