पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करणारी १० ठिकाणं

पावसाळा म्हटलं की आपसूकच फिरावसं वाटतं आणि पाऊलं घराबाहेर पडतात. मात्र फिरण्यासाठी मोठा प्रश्न असतो .

पावसाळ्यात माथेरानमध्ये ट्रेकिंग करण्याचा आणि वन सौंदर्य पाहण्याचा आनंद घेता येतो.

पर्यावरणमुक्त हिल स्टेशन अशी ओळख असलेल्या माथेरानमध्ये पर्यटक सुट्टीचा खरा आनंद घेऊ शकतात. मुंबईपासून 110 किलोमीटर अंतरावर असलेलं हे हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून 803 मीटर अंतरावर आहे.

माळशेज घाटही पाहण्यासारखा आहे.

पावसाळ्यामध्ये माळशेज घाटातील दृष्य डोळ्यात सामावून घ्यावं तेवढं कमी पडतं. हा घाट अहमदनगर ते कल्याण दरम्यानचा सर्वात मोठा घाट आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातही पाहण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. पन्हाळा, राधानगरी अशी ठिकाणं आहेत.

मुंबई किंवा पुण्यात राहणाऱ्यांसाठी लोणावळा आणि खंडाळा हे ठिकाण सोयीचं पर्यटनस्थळ आहे.

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर महाराष्ट्रातील प्रसिद्ध हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. 

कोयना धरणावर विविध सिंचन, विद्युत प्रकल्प बांधलेले आहेत. पावसाळ्यात कोयना धरणाच्या सौंदर्यात भर घालणारे विविध पक्षी पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय असतात.

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे हिल स्टेशन विदर्भातील नंदनवन म्हणून ओळखलं जातं.

भिमाशंकर येथे महाराष्ट्राचा वन्य प्राणी शेकरु आणि खार यांसारखे दुर्मिळ वन्य जीव आढळतात.

मराठवाड्यातील थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जाणारं महेशमाळ देखील शहरापासून अवघं 25 किलोमीटर आहे. 

अंबोली हे समुद्रसपाटीपासून 690 मीटर उंचीवर असणारं ठिकाण आहे. अंबोलीपासून जवळच इतरही प्रसिद्ध पर्यटनस्थळं आहेत.

Click Here