कधी विचार केला आहे का? फक्त 10 मिनिटे रोज दिलीत, तर आयुष्य वाढू शकतं!
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या संशोधनानुसार, दररोज फक्त 10 मिनिटांचा शारीरिक व्यायाम हृदयाच्या आजारांचा धोका कमी करतो.
चालणे म्हणजेच औषध! 10 मिनिटे चालल्याने रक्ताभिसरण सुधारते, ताण कमी होतो आणि मेंदू सक्रिय राहतो.
मन शांत ठेवते- ध्यान किंवा श्वसनाचे 10 मिनिटांचे सत्र मानसिक आरोग्य सुधारते, चिंताही कमी होते.
मेंदूला मिळते ऊर्जा- हलका व्यायाम मेंदूमध्ये ‘एंडॉर्फिन’ नावाचे आनंदाचे हार्मोन्स वाढवतो, ज्यामुळे मूड सुधारतो.
झोप सुधारते- सकाळचा व्यायाम किंवा चालणे शरीराचा बायोलॉजिकल क्लॉक सेट करतो आणि झोपेची गुणवत्ता वाढवतो.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते- नियमित 10 मिनिटांची शारीरिक हालचाल शरीरातील इम्युन सेल्स सक्रिय ठेवते.
पचन सुधारते- चालणे किंवा हलका योग केल्याने पचनक्रिया सुरळीत राहते आणि गॅस, अपचन कमी होते.
दीर्घायुष्याची गुरुकिल्ली- जगभरात दीर्घायुष्य लाभलेल्या लोकांमध्ये एक गोष्ट समान आढळते, रोजची 10 मिनिटांची हालचाल!
आजपासून सुरुवात करा! फक्त 10 मिनिटे स्वतःसाठी काढा... आयुष्य स्वतःहून वाढेल!