४०० पार सत्यात उतरवणाऱ्या राजीव गांधींबद्दलच्या १० महत्वाच्या गोष्टी 

राजकारण करायचं नव्हतं मात्र...

राजीव गांधी यांचं राजकारणात आगमन अनैच्छिक होतं; ते राजकारणात येण्याआधी इंडियन एअरलाईन्समध्ये वैमानिक होते.

ते भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान होते; फक्त 40 वर्षांचे असताना 1984 मध्ये पंतप्रधान झाले.

इंग्लंडमधील केंब्रिजमध्ये शिक्षण घेताना त्यांची सोनिया गांधीशी भेट झाली आणि नंतर त्यांचे लग्न झाले.

त्यांनी 1984 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला ऐतिहासिक बहुमत दिले. काँग्रेस 542 पैकी 411 जागा जिंकून सत्तेत विराजमान झाली

राजीव गांधी यांनी संगणक आणि टेलिकॉम क्षेत्रात आधुनिक सुधारणा करून भारताला डिजिटल युगात प्रवेश दिला.

1986 मध्ये त्यांनी 'जवाहर नवोदय विद्यालय योजना' सुरू केली ज्यामध्ये मोफत निवासी शिक्षण दिले जात होते.

1988 मध्ये श्रीलंकेत एलटीटीई या दहशतवादी संघटने विरोधात शांतीसेना पाठवण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

त्यांच्या काळात भारताने आशियायी क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले.

1991 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात चेन्नईजवळ मानवी बॉम्बने त्यांची हत्या झाली; ह्या हत्येची जबाबदारी एलटीटीईने घेतली.

Click Here

त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळाला आणि त्यांच्या नावावर विविध सामाजिक, शैक्षणिक, आणि क्रीडा पुरस्कार व योजना सुरू आहेत.