High Protein डाएटसाठी श्रावण मोडताय... थांबा ही माहिती तुमच्यासाठी
आम्ही तुमच्यासाठी १० शाकाहारी प्रोटीनयुक्त पर्याय घेऊन आलो आहोत.
हाय प्रोटीन डाएटसाठी तुम्ही श्रावण मोडण्याच्या तयारीत असाल तर थांबा... आम्ही तुमच्यासाठी १० शाकाहारी प्रोटीनयुक्त पर्याय घेऊन आलो आहोत.
सोयाबीन हे प्रथिनांनी खूप समृद्ध आहे आणि स्नायू, अवयवाच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. तुम्ही सोयाबीनची भाजी, वड्या किंवा टोफू स्वरुपात सेवन करू शकता.
मोड आलेली कडधान्ये – मूग डाळ, हरभरा, मसूर, मटकी या कडधान्यात भरपूर प्रथिने असतात. मोड आलेली दाळ/शेंगदाणे सॅलड किंवा उपवासाच्या स्नॅक्ससाठी उपयुक्त.
पनीर – पनीर हा दुधाचा प्रोटीनयुक्त सर्वोत्तम पर्याय आहे. पनीर भुर्जी, सॅलड किंवा ग्रिल्ड स्वरूपात सेवन करु शकता.
दही, ग्रीक योगर्ट – दही आणि ग्रीक योगर्टमध्ये कॅल्शियमसोबतच दर्जेदार प्रथिने असतात. नाष्ट्याला किंवा जेवणात दही घ्या.
राजगिरा – राजगिरा हे श्रावणातील उपवासासाठी उपयुक्त असून प्रोटीन, मॅग्नेशियम, फायबरचे उत्तम स्रोत आहेत.
नट्स शेंगदाणे आणि विविध प्रकारचे नट्स सकाळच्या नाश्त्यात, सॅलडमध्ये घालून तुम्ही तुमच्या शरिराला प्रथिनांचा चांगला पुरवठा करू शकता.
खसखस - सूर्यफूल, फ्लॅक्ससीड्स, खसखस या बियांमध्ये प्रथिनाबरोबर ओमेगा-३, फायबर मोठ्या प्रमाणात असतात. स्नॅक्समध्ये, उपवासासाठी देखील याचा वापर होऊ शकतो.
शेंगदाणे, काजू - साबुदाणा खिचडीमध्ये शेंगदाणे, काजू टाकल्याने प्रोटीनचे प्रमाण वाढते; उपवासाच्या दिवशी ऊर्जा टिकवायला याची मदत होते.
टोफू - टोफू हे शाकाहारी आणि प्रोटीनचा एक परिपूर्ण पर्याय आहे, विशेषतः मांसाहाराला टोफू हा एक उपयुक्त आणि चांगला पर्याय ठरू शकतो.
हरभरे - उकडलेले काळे हरभरे, अंकुरलेले चणे भरपूर प्रोटिन देतात; उपवासाच्या दिवशी तुम्ही त्याचे सलाड खाऊ शकता.