गुरुवारी दुर्गाष्टमी: ५ राशींना शुभ-लाभ!

०३ जुलै २०२५ रोजी गुरुवारी दुर्गाष्टमी आहे.

सर्वार्थ सिद्धी योगात गुरुवारी ०३ जुलै २०२५ दुर्गाष्टमी तिथी आहे. या दिवशी गुरु आणि चंद्र केंद्र योगात असतील.

हस्त नक्षत्राचा योग जुळून येत आहे. गुरुवार या दिवसावर गुरु ग्रहाचे अधिपत्य असते. या दिवशी दत्तगुरु, स्वामीचे विशेष पूजन केले जाते.

दुर्गाष्टमीला देवीचे विशेष पूजन केले जाते. गुरुवारी दुर्गाष्टमी येणे हा विशेष आणि शुभ योग मानला गेला आहे. 

कोणत्या राशींना हा दिवस अनुकूल, लाभाचा ठरू शकेल? स्वामी आणि महालक्ष्मी देवीची कृपा राहू शकेल? पाहुया...

मेष: दिवस अनुकूल ठरू शकेल. व्यवसाय, नोकरीत अनेक लाभ होतील. कार्यविस्तार करू शकाल. शत्रू परास्त होतील. धनलाभ होण्याची शक्यता. 

मिथुन: विविध लाभ मिळू शकतील. कुटुंबाकडून सहकार्य मिळू शकेल. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकेल. वाहन सुख मिळू शकेल. मन प्रसन्न होऊ शकेल.

कन्या: कामे वेळेत पूर्ण होऊ शकतील. कामाच्या ठिकाणी लाभ होऊ शकतील. पैशांची बचत करू शकाल. आत्मविश्वास वाढू शकेल. मान-सन्मान मिळू शकेल.

तूळ: विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. समस्या दूर होऊ शकतील. सुख-समृद्धी लाभू शकेल. प्रयत्न यशस्वी ठरू शकतील. वैवाहिक जीवन आनंदी राहू शकेल.

कुंभ: नशिबाची साथ लाभू शकेल. अडचणी दूर होऊ शकतील. लोकप्रियता वाढू शकेल. एखादा मोठा निर्णय घेऊ शकाल. मानसिक शांतता लाभू शकेल.

सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल.

Click Here