युट्यूब वापरकर्त्यांसाठी नवीन नियम!

आता सर्वजण युट्यूबवर लाईव्ह स्ट्रीम करू शकणार नाहीत.

गुगल आता युट्यूब वापरकर्त्यांसाठी एक नवीन नियम लागू करण्याची तयारीत आहे. 

नवा नियम लागू झाल्यानंतर सर्वजण युट्यूबवर लाईव्ह स्ट्रीम करू शकणार नाहीत. 

येत्या २२ जुलैपासून युट्यूब लाईव्ह स्ट्रीम होस्ट करण्यासाठी किमान वय वाढवण्यात आले.

यापुढे १६ वर्षांखालील किशोरवयीन मुले  युट्यूबवर लाईव्ह स्ट्रीम करू शकणार नाहीत. 

अल्पवयीन मुलांची सुरक्षितता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे युट्यूबकडून स्पष्ट करण्यात आले.

युट्यूब हे एक लोकप्रिय व्हिडिओ-शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे. 

युट्यूब वापरकर्त्यांची संख्या २.५ अब्जांपेक्षा जास्त आहे.

Click Here