कॅन्सरचा धोका कमी करणारे ५ पदार्थ 

सध्या कॅन्सरच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. 

म्हणूनच हा आजार आपल्यापर्यंत येऊ नये म्हणून काही गोष्टींची आधीच काळजी घेतलेली बरी...

त्यापैकी एक म्हणजे भरपूर अँटिऑक्सिडंट देणारे पदार्थ खाणे हे पदार्थ खाल्ल्यामुळे कॅन्सरचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो. 

त्यापैकी पहिला पदार्थ म्हणजे हिरव्या पालेभाज्या. त्यातून बीटा कॅरोटीन, फोलेट आणि ल्युटीन असे अँटी-ऑक्सीडंट्स मिळतात. 

टोमॅटोमध्ये असणारं लायकोपिन हे देखील एक खूप प्रभावी अँटीऑक्सिडेंट आहे. 

हळदीमध्ये असणार कर्क्युमिन शरीरातला इन्फ्लेशन कमी करण्यास मदत करते. त्यामुळे कॅन्सरच्या पेशींची वाढही कमी होते. 

ग्रीन टी हा देखील अँटीऑक्सिडंटचा एक उत्तम स्त्रोत मानला जातो.

डाळिंबामध्ये असणारे पॉली फेनोल आणि फ्लावोनाईड्स हे घटकही कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी मदत करतात. 

Click Here