..म्हणून सारखं पोट दुखतं, महिलांनी टाळा 'या' चुका 

सतत पोट दुखत असेल तर पाहा काय चुकते. काळजी घ्या आणि लक्षात ठेवा या गोष्टी. 

महिलांमध्ये पोट दुखणे, पोटात गुडगुड होणे , ब्लोटींग या समस्या वरचेवर दिसून येतात. सतत पोटाची काही ना काही कुरकुर असते. 

पोटाचे हे त्रास महिला बाईपणाच्या नावावर थोपून मोकळ्या होतात. मात्र काही वेळा पोटाचे आजार आपल्याच काही चुकांमुळे उद्भवतात. 

पाळीच्या दिवसांमध्ये आरामाची गरज असते. तो आपण आपल्या शरीराला द्यायलाच हवा. तो न दिल्यामुळे पाळी झाल्यावरही पोट दुखतं. योग्य आराम घ्याच. 

तसेच लहान दुखण्यामध्ये पेन किलर घेणे टाळा. सतत पेन किलर घेण्याची सवय म्हणजे व्यसनच. सहनशक्ती कमी होते आणि पोट सारखे दुखते. 

क्रेविंग्स होतात असे म्हणून काहीही खात सुटणे ही फार वाईट सवय आहे. तळलेले आणि वातूळ पदार्थ खाणे पोटासाठी चांगले नाही. ते कमीच खावेत. 

तसेच तरुण मुलींमध्ये अनेक कारणांमुळे पोट दुखू शकते. शरीरात होणारे बदलही कारणीभूत ठरतात. त्यामुळे योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्रास अंगावर काढू नका. 

पाळीची तारीख जवळपास असताना आहारावर नियंत्रण ठेवावे. पोटात गॅस तयार होतो आणि त्यामुळे पाळीच्या आधी आणि नंतरही पोट दुखते. 

महिलांनी एखादा व्यायाम प्रकार नियमित करावा. चालणे, धावणे, जिम किंवा आवडता खेळ. काहीही असू शकते. शरीराची हालचाल झाली की पचनक्रिया छान होते. पोट कुरकुर करत नाही. 

Click Here