थंडीच्या दिवसांत आळस वाढतो ? पाहा काय करायला हवे. सोप्या उपायांनी येते तरतरी.
थंडीच्या दिवसांत बसल्याबसल्या काम करताना झोप येते. तसेच आळसही येतो. दिवसभर पडून राहण्याची इच्छा होते.
काही सोपे करुन आळस घालवता येतो. काही सवयी फायद्याच्या ठरतात. पाहा काय करायला हवे. आळस अजिबात येणार नाही.
थंड पाण्याने चेहरा धुणे फायद्याचे ठरते. काही तासांच्या फरकाने चेहर्यावर गार पाणी लावायचे. नक्कीच फायदा होते.
सलग एकाच जागी बसणे टाळावे. फेरफटका मारा, मित्रमैत्रीणींशी गप्पा मारा. सतत बसल्यामुळे थंडीत अंग आखडते. ते मोकळे झाले की आळस कमी होतो.
काम संपवण्यासाठी वेळ ठरवा. अमुक तासात तमुक काम संपवायचेच आहे असे ठरवून काम करायचे. त्यामुळे स्वत:ला शिस्त लागते.
दिवसाची सुरवात जास्त धकाधकीची करु नका. कारण साकळीच शरीर दमले तर दिवसभर आळस जाणवतो.
थंडीच्या दिवसांत झोप फार छान लागते. झोप पूर्ण करा. कामाच्या टेंशनमध्ये झोप कमी झाली की दुसर्या दिवशी आळसही येतो.
घाम येईल अशा कृती करा. घाम आल्यावर आळस कमी होतो आणि तरतरी येते. त्यामुळे शारीरिक मेहनत करणे फायद्याचे ठरते.