मेट्रो किंवा मोनोरेलला ओपन विंडो का नसते?

मोनो, मेट्रोच्या खिडक्या बंद असण्यामागे अनेक कारणं आहेत.

प्रवाशांच्या सुविधेसाठी देशभरात अनेक ठिकाणी मेट्रो धावतांना दिसतात.

मोनो आणि मेट्रोमध्ये अनेक सोईसुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. मात्र,एक गोष्ट अशी आहे जी विचार करण्यासारखी आहे ती म्हणजे खिडकी.

मोनो, मेट्रोच्या खिडक्या कायम बंद असतात. या नेमक्या कायम पॅकबंद का असतात ते जाणून घेऊयात.

मोनो, मेट्रोमध्ये जाणीवपूर्वक खिडक्यांची तशी रचना केली असते.

मोनो, मेट्रो उंचावरुन धावत असतात त्यामुळे आपात्कालीन परिस्थिती प्रवासी खिडकीतून बाहेर पडण्याचा वा उडी मारण्याचा धोका असतो.

या गाड्या पूर्णपणे वातानुकूलित असल्यामुळे खिडकी ओपन असल्यास त्याचा परिणाम वातानुकूलित यंत्रणेवर पडतो.

शहरी भागात अनेकदा मोनोरेल आणि मेट्रो इमारतींच्या जवळून धावतात. त्यामुळे खिडकी असल्यास इमारतीत राहणाऱ्या लोकांची प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते.

रात्री झोपच लागत नाही? आहारात समाविष्ट करा हे सुपरफूड

Click Here