जुई गडकरी मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
जुई गडकरीने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत अचानक नॉनव्हेज खाणं बंद का केलं याबद्दल सांगितलं.
जुई गडकरी म्हणाली की, ''यामध्ये काही धार्मिक कारणंदेखील आहेत. आपण देवाचं काही करत असतो आणि आपण त्याचबरोबर नॉनव्हेज पण खात असतो. मला ते नाही पटत.''
ती पुढे म्हणाली की, ''माझ्या बाबतीत असं झालं की, मी प्राणी प्रेमी आहे. माझ्या स्वतःकडे खूप पेट्स आहेत. असं असून प्राण्यांनाच खायचं या गोष्टीचा मला खूप त्रास व्हायचा.''
मी एक दिवस ठरवून टाकलं की बस्स आपल्याला त्यावेळी कळत नव्हतं म्हणून आपण खाल्लं, ठीक आहे. पण आता कळतंय तर आपण आता सोडूया. मग मी ते सोडलं आणि आता ते कायमचं सोडल्याचं जुई सांगते.
घरी नॉनव्हेज खातात का? यावर ती म्हणाली, ''माझ्या घरी खातात. पण मी वेगळी राहते. माझं घर दुसरीकडे आहे. आई-बाबांच्या घरी गेले की ते खातात पण माझ्या घरात आणायला सुद्धा परवानगी नाही.''
''मी कोणालाच घरी नॉनव्हेज आणायला परवानगी देत नाही त्यामुळे खाण्याचा तर संबंधच नाही'', असे जुई म्हणाली.