Bus Fire: धावत्या वाहनांना अचानक आग लागण्यामागचे कारण जाणून घेऊयात.
वाहनांना अचानक आग लागण्याच्या घटनांनी प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.
या भीषण अपघातांमध्ये इंजिन, वायरिंग किंवा इतर यांत्रिक बिघाड कारणीभूत असू शकतात.
वाहनाच्या इंधन लाईनमध्ये किंवा इंजिनच्या आसपास जर गळती झाल्यास उष्णतेमुळे किंवा ठिणगीमुळे इंधन पेट घेऊन आग लागण्याचा धोका असतो.
खराब झालेले किंवा सैल वायरिंग, शॉर्ट सर्किट, तसेच वारंवार उडणारे फ्यूज हे सर्व वाहनातील आग लागण्याची शक्यता वाढवतात.
एक्झॉस्ट सिस्टीम अतिउष्ण होणे, इंजिनमध्ये बिघाड होणे किंवा इंजिनमधून येणारे विचित्र आवाज हे आगीचे संकेत असू शकतात.
उन्हाळ्यातील प्रखर तापमान आणि वाहनाचा सततचा वापर यामुळे इंजिन जास्त गरम होऊ शकते. यामुळे वाहनाच्या काही घटकांवर ताण येतो आणि आग लागण्याचा धोका वाढतो.
वाहन अपघातांमुळे इंधन किंवा तेल गळती होऊ शकते. अशा परिस्थितीत, कोणतीही ठिणगी पडल्यास आग लागण्याची शक्यता असते.
वाहनाची नियमित तपासणी करणे, वायरिंग आणि इंधन प्रणाली वेळोवेळी तपासणे, तसेच इंजिनमध्ये होणारे बदल दुर्लक्ष न करणे अत्यंत आवश्यक आहे.