उसाचा रस पिणं कोणी टाळावं?

उसाचा रस म्हणजे उन्हाळ्यातला गारवा. म्हणूनच उन्हाळा आला की प्रत्येक रस्त्यावर हमखास रसवंती दिसू लागतात. 

त्यातून झटपट एनर्जी मिळते. शिवाय त्यात भरपूर व्हिटॅमिन्स आणि खनिजेही असतात. 

उसाचा रस आरोग्यदायी असला तरी काही व्यक्तींनी मात्र तो टाळायलाच हवा. कारण तो त्यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो.

त्यापैकी एक म्हणजे मधुमेह असणाऱ्या व्यक्ती. उसाच्या रसामध्ये आधीच नॅचरल शुगर जास्त असते आणि त्यात काही रसवंतीमध्ये जास्तीची साखरही घातली जाते.

ज्या व्यक्तींना वजन कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे त्यांनी उसाचा रस पिणं टाळायला हवं. कारण त्यातून खूप जास्त कॅलरी पोटात जातात.

ज्या लोकांच्या नेहमीच पचनाच्या वेगवेगळ्या तक्रारी असतात, त्यांनीही उसाचा रस पिणं टाळायला हवं. कारण त्यात घातल्या जाणाऱ्या बर्फातून वेगवेगळे इन्फेक्शन्स होऊ शकतात.

Click Here