लहान वयातच कमवत आहे लाखो. दिसायला गोड आणि कॉर्पोरेट क्षेत्राची जाण असलेली सना गांगुली.
सौरव गांगुली ची मुलगी सना गांगुलीने लहान वयातच फार कमालीचे यश प्राप्त केले आहे.
सनाचा जन्म २००१ चा असून, कलकत्तामधील लोरेटो हाऊस स्कुलमध्ये सनाच्या शैक्षणिक वाटचालीची सुरवात झाली.
सनाने युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून शिक्षण पूर्ण केले. अर्थशास्त्र विषयात तिचा दांडगा अभ्यास आहे.
शिक्षण घेत असताना सनाने अनेक इंटर्नशिप्सही केल्या आहेत.
HBSC,KPMG,ICICI सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये सनाने काम केले आहे.
सनाने शिक्षण पूर्ण करत PwC सारख्या बीग ४ मध्ये येणार्या कंपनीमध्ये काम केले. तेथे तिला वार्षिक ३० लाखाची मिळकत होती.
सध्या सना डेलॉइट सारख्या कंपनीमध्ये काम करत आहे. जूनपर्यंत तिची इंटर्नशिप आहे. वार्षिक ५ ते १२ लाखाचे पॅकेज सनाकडे आहे.
सना कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये चांगले यश मिळवत आहे. तसेच इंस्टाग्रामवर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्याही भरपूर आहे.