गोड शंकरपाळे खुसखशीत होण्यासाठी टिप्स 

संकरपाळे करताना लक्षात ठेवा या टिप्स. पाहा कसे करायचे परफेक्ट शंकरपाळे. 

दिवाळीत शंकरपाळे तर हवेतच. फराळात शंकरपाळे महत्वाचे असतात. तसेच करायलाही सोपे असतात. 

तिखट शंकरपाळ्या केल्या जातात आणि गोडही. गोड शंकरपाळ्या छान खुसखुशीत होतात. मात्र बरेचदा फसतात. 

शंकरपाळी कडक होऊ नये यासाठी पीठ मळताना त्यात पाच ते सहा चमचे तूप घालायचे. जास्त घातले तरी चालते. 

मैदा चांगला चाळून घ्यायचा आणि मुख्य म्हणजे मैदा जास्तवेळ भिजवयाचा तो लगेच लाटायला घ्यायचा नाही. 

मैदा फक्त पाण्यात किंवा फक्त दुधात भिजवू नका. अर्धीवाटी दूध आणि तेवढेच पाणी घ्या. म्हणजे अगदी योग्य प्रमाणात पीठ मळले जाते. 

शंकरपाळे तळण्यासाठी तूप वापरा. तेलात तळणे टाळा. त्यामुळे ते छान खमंग होतात. तसेच सुगंधही येतो. 

Click Here