स्टील, अॅल्युमिनियम, लोखंड... आरोग्यासाठी नेमकं काय चांगलं हे जाणून घ्या
प्रत्येक घरामध्ये जेवण बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भांड्याचा वापर केला जातो.
कोणत्या भांड्यामध्ये जेवण बनवणं आरोग्यासाठी चांगलं आहे याबाबत लोकांना नेहमीच प्रश्न पडतो.
गॅस किंवा स्टोव्हवर जेवण बनवत असाल तर स्टेनलेस स्टीलचा वापर करणं बेस्ट आहे. कारण यात केमिकल रिएक्शन होत नाही.
अॅल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये जेवण बनवणं खूप सोपं आहे. पण यामध्ये टॉमेटो, चिंच असलेले पदार्थ बनवणं हानिकारक ठरतं.
लोखंडाच्या भांड्य़ात जेवण बनवणं फायदेशीर आहे. मात्र ही भांडी जड असल्याने रोज त्याचा वापर करणं अवघड आहे.