मुंबईतल्या मिठी नदीचा उगम कुठे होतो, तुम्हाला माहितीये का?
मुंबईतील मिठी नदी सध्या स्वच्छतेच्या घोटाळ्यामुळे चर्चेत आली आहे.
मिठी नदी विहार आणि पवई तलावांच्या प्रवाहातून उगम पावते आणि माहीम खाडीतून अरबी समुद्राला मिळते.
मिठी नदीची लांबी एकूण १७.८ किलोमीटर आहे. प्रदूषणामुळे ही नदी चर्चेत आहे.
गेल्या दोन दशकांमध्ये बीएमसीने गाळ काढण्याचे अनेक प्रयत्न केले, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
नदीच्या स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला. मात्र, त्यात मोठा भ्रष्टाचार देखील झाला.
मिठी नदी स्वच्छ करण्याच्या नावाखाली झालेल्या ६५ कोटींच्या घोटाळ्याची चौकशी आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.
या घोटाळ्यात अभिनेता डिनो मोरिया आणि त्याच्या भावाचे नाव देखील समोर आले आहे.