डिजिटल उपकरणे वापरताना लक्षात ठेवा या गोष्टी. काही नियम अजिबात विसरुन चालणार नाहीत.
डिजिटल सेल्फ केअर रुटीन म्हणजे मोबाइल, इंटरनेट, सोशल मीडिया आणि स्क्रीन वापरामुळे होणारा मानसिक-शारीरिक ताण कमी करून स्वत:साठी आरोग्यदायी डिजिटल सवयी तयार करणे.
स्क्रीन टाइमवर नियंत्रण दिवसभरात स्क्रीनकडे पाहण्याचा वेळ मर्यादित ठेवणे कामाचे आणि वैयक्तिक वापराचे वेगळे वेळापत्रक करणे गरजेचे असते.
सोशल मीडिया डिटॉक्स रोज काही वेळ सोशल मीडिया बंद ठेवणे किंवा आठवड्यात एक दिवस ‘नो-सोशल-मीडिया डे’ ठेवणे, ज्यामुळे सततची तुलना, माहिती ओव्हरलोड कमी होतो.
नोटीफिकेशन बंद ठेवणे सतत पिंग्स येत राहिल्यामुळे मेंदूला सतत व्यत्यय येतो. त्यामुळे फक्त आवश्यक अॅप्सच्या नोटिफिकेशन्स चालू ठेवा बाकी बंद करा.
डिजिटल ब्रेक घेणे काम करताना दिवसभर स्क्रीन पाहावी लागते. मात्र त्याचा त्रास होऊ नये म्हणून मधे-मधे काही मिनिटे ब्रेक घ्यायलाच हवा.
अल्गोरिदम सेट करणे सोशल मिडियावर अल्गोरिदम फार महत्त्वाचा असतो. आपण काय पाहतो त्याचा मनावर परिणाम होतो. त्यामुळे चांगले आणि बुद्धीला खत-पाणी देणारेच पाहा.