वजन कमी करायला मदत करतात हे ज्यूस. चवीलाही अगदी मस्त. रोज प्या आणि आनंदी राहा.
वजन कमी करण्यासाठी हे दहा ज्यूस पिणे ठरेल फायद्याचे. या आरामात उपलब्ध होणार्या फळांचा रस आरोग्यासाठी फार चांगला असतो. वजन कमी करण्यातही मदत करतात आणि पोटालाही आराम देतात.
अननसाचा ज्यूस चवीला फार छान असतो. अननस ब्लोटींग कमी करण्यासाठी मदत करते.
कलिंगडाचा ज्यूस तर सगळेच आवडीने पितात. कलिंगडात पाण्याचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे हा ज्यूस प्यायल्यावर पोटाला थंडावा मिळतो आणि कॅलरिज कमी असल्यामुळे वजनही वाढत नाही.
संत्र्याचा ज्यूस पिणे आरोग्यासाठी फार फायद्याचे ठरते. त्यात जीवनसत्त्व सी असते. तसेच अँण्टी ऑक्सिडंट्स असतात. पचनक्षमता वाढवण्यासाठी हा रस उपयुक्त ठरतो.
बीटाचा रस पिणे आरोग्यासाठी फार चांगले असते. त्वचेसाठी तसेच पचनासाठी चांगले असते.
काकडीचा रस प्यायल्याने पोटाला आराम मिळतो. काकडीमुळे वजन वाढत नाही. त्यात फॅट्स अगदी नाहीच्या बरोबर असतात. पाणी भरपूर असते.
रोज सकाळी एका लिंबाचा रस प्यायल्याने अनेक फायदे मिळतात. पचनासाठी ते फायद्याचे असतेच. शरीराचे डिटॉक्स करण्यासाठी लिंबू पाणी फायद्याचे असते.
गाजराचा रस पिणे वजन कमी करण्यासाठी फायद्याचे ठरतेच आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीही उपयुक्त ठरते.