लखलखत्या ताऱ्याची तेजस्वी कामगिरी!

भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला अलविदा केला.

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने तडकाफडकी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

विराटने जून २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०२५ मध्ये खेळण्यात आलेल्या सिडनी कसोटी सामना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला.

कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना विराटने १२३ सामन्यांमध्ये २१० डावात ९ हजार २३० धावा केल्या आहेत. 

कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ३० शतके आणि ३१ अर्धशतकांची नोंद आहे.

विराटने कसोटी क्रिकेटमध्ये १ हजार २७ चौकार आणि ३० षटकार ठोकले आहेत.

विराटची सर्वोच्च धावसंख्या २१४ असून त्याने सात वेळा २०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

Click Here