विक्रांत मेस्सीच्या मुलाच्या जन्मदाखल्यात धर्माचा रकाना कोरा कारण..

धर्म ही मानव निर्मित कल्पना आहे.  नक्की काय म्हणाला विक्रांत. 

विक्रांत मेस्सी हा सध्या बॉलिवूडमधील नावाजलेला अभिनेता आहे. मिर्जापुर आणि 12th fail मधील त्याच्या भूमिका फार लोकप्रिय ठरल्या. सध्या मात्र तो वेगळ्या विषयामुळे चर्चेत आहे. 

विक्रांत आणि शीतल ठाकुर यांच्या मुलाचे नाव वरदान आहे. वरदानचा जन्म २०२४ मध्ये झाला. रेहा चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये विक्रांतने वरदानच्या जन्म दाखल्यात त्याचा धर्म नमूद नसल्याचे सांगितले.

विक्रांतच्या घरात सगळ्या धर्माचे लोक आहेत आणि त्याला त्याचा अभिमान असल्याचे त्याने सांगितले. सगळ्या धर्मांचा तो आदर करतो आणि त्यामुळे मुलावर स्वत:चा धर्म लादायची इच्छा नाही. 

विक्रांतला 'धर्म' ही संकल्पना मानवनिर्मित वाटते. अर्थात धर्माबद्दल सगळ्यांच्या आपापल्या मान्यता असतात. 

विक्रांतच्या भावाने इस्लाम धर्म स्वीकारला तर विक्रांतचे वडील ख्रिश्चन आणि आई शिख असल्याने विक्रांत  सर्व धर्म समभाव मानतो.

त्याचा मुलगा ज्या धर्माचा स्वत:हून स्वीकार करेल ते विक्रांत आणि त्याच्या बायकोला मान्य असेल, असे त्याने सांगितले. 

विक्रांतची ही भूमिका ऐकून लोकांनी अनेकविध प्रतिक्रिया दिल्या. काहींना फक्त पब्लिसिटी वाटते तर काही त्याला धर्माबद्दल अभिमान बाळगण्याचा सल्ला देत आहेत. 

Click Here