२ वर्षात घटस्फोट, पर्सनल लाईफमुळे चर्चेत राहिली ही टीव्ही अभिनेत्री
अभिनेत्री उर्वशी ढोलकियाला आजही लोक 'कसौटी जिंदगी की'मधील कोमोलिका म्हणून ओळखतात.
उर्वशी ढोलकिया केवळ तिच्या व्यक्तिरेखेमुळेच नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.
उर्वशीचे वयाच्या १६ व्या वर्षी लग्न झाले. वयाच्या १७ व्या वर्षी तिने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला.
लग्नानंतर दोनच वर्षांनी उर्वशी पतीपासून विभक्त झाली. त्यानंतर उर्वशीने लग्न केले नाही. तसेच दुसऱ्या लग्नाचा विचारही केला नाही.
उर्वशीने एकटीने तिच्या दोन्ही मुलींचा सांभाळ अतिशय चांगल्याप्रकारे केला.
तिच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर तिच्या मुलांचे फोटो पाहायला मिळतात.
उर्वशीने घर एक मंदिर, कभी सौतन कभी सहेली, कही तो होगा यांसारख्या अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या.