अभ्यासाला बसल्यावर लगेच झोप येतेच. पाहा काय उपाय करु शकता.
अभ्यासाला बसल्यावर झोप येणे ही फारच कॉमन समस्या आहे. अभ्यासात मन रमवणे कठीण जाते. मात्र काही उपाय केल्याने अभ्यास करताना झोप येणार नाही.
रात्री जागू नका. योग्य वेळी झोपायचे. किमान सात ते आठ तासाची झोप घ्यायची. झोप पूर्ण झाल्यावर अभ्यास करताना येत नाही.
अभ्यासाला बसायची जागा स्वच्छ आणि चांगली निवडा. जागेचा नक्कीच फरक पडेल. अभ्यास चांगला होईल.
अभ्यास करताना विविध पद्धतींचा वापर करायचा. जसे की जोरात वाचणे, कोणाशी तरी संवाद साधणे आणि आरशात पाहून पाठांतर करणे.
दर ३० ते ४० मिनिटांनी १० मिनिटांचा ब्रेक घ्यायचा. डोक्याला जरा आराम मिळाला की झोप येत नाही.
सतत पाणी पित राहायचे. शरीर डायड्रेटेड ठेवल्यावर झोप कमी येते. थोडे थोडे पाणी पित राहायचे.
गादीवर बसून सोफ्यावर झोपून अभ्यास करायचा नाही. असे केल्याने झोप जास्त येते. स्थिर ताठ बसूनच अभ्यास करायची.
काळोखात अभ्यास करु नका. उजेडात बसा. दिवा मोठा लावायचा. त्यामुळे झोप येत नाही. प्रकाश जास्त असल्यावर अभ्यासही होतो.
वातूळ पदार्थ कमी खा. त्यामुळे झोप येते. पौष्टिक आहारच घ्यायचा. अति खाऊ नका. प्रमाणातच खा.