पनीरचे ८ स्पेशल पदार्थ, खाओ जी भर के

पनीरच्या या काही रेसिपी नक्की करुन पाहा. चवीला अगदी मस्त. 

पनीरचे अनेक पदार्थ केले जातात. त्यापैकी काही आपण फार आवडीने खातो. असेच आठ लोकप्रिय पदार्थ पाहा.

नाश्त्यासाठी पनीर बुर्जी करु शकता. तसेच जेवणासाठीही करु शकता. करायला सोपी अशी ही रेसिपी आहे. 

पालक पनीर ही फार लोकप्रिय भाजी आहे. पौष्टिकही आहे आणि चविष्टही.

इतर कोणत्याही पनीर रेसिपी फार प्रसिद्ध नव्हत्या त्या वेळेपासून मटर पनीर हा प्रकार मेन्यूमध्ये आहे. घरी करायला अगदी सोपी असते. 

काही अगदी पोट भरीचे खायचे असेल तर शाही पनीर ही भाजी खा. थोडी खाल्ली तरी मन तृप्त होते. 

भाताचे अनेक प्रकार भारतात केले जातात. त्यापैकी एक म्हणजे पनीर पुलाव. त्या सोबत रायता मिळाला तर मग मज्जाच. 

मलाई कोफ्ता ही भाजी लहान मुलांना फार आवडते. त्यातही महत्त्वाचा पदार्थ हा पनीरच असतो. पनीरमुळे कोफ्ता मऊ होतो. 

साईड डिशसाठी पनीर टिक्का फार आवडीने खाल्ला जातो. त्यासोबत हिरवी चटणी खातात. 

धाबा स्टाईल पनीर बटर मसाला ताटात असला की दोन पोळ्या जास्तच जातात. घट्ट आणि खमंग अशी ही भाजी घरी करणे अगदी सोपे आहे. 

Click Here
Click Here