भारताच्या विविध भागातील पारंपरिक बांगड्या. सगळ्याच सुंदर आणि हटके.
भारतात राज्यानुसार पेहराव बदलतो. फक्त कपडेच नाही तर दागिनेसुद्धा. सगळेच सुंदर आणि हटके असतात.
लग्नात नवरी सुंदर सजते. भरपूर दागिन्यांनी मडते. लग्नामध्ये महिलेच्या सगळ्या दागिन्यांना फार मान असतो. तसेच बांगड्यांनाही असतो.
विविध राज्यांमध्ये बांगड्या वेगवेगळ्या प्रकारच्या घातल्या जातात. जसे महाराष्ट्रात चुडा भरला जातो.
बंगालमध्ये शाखा पोला नावाच्या बांगड्या घरातील मोठ्यांमार्फत नवरीला भेट म्हणून दिल्या जातात. पुढील संसार सुखाचा व्हावा यासाठी त्या आशीर्वाद मानल्या जातात.
कर्नाटकात गुरविंद कडा नवरीला दिला जातो. या कड्याची खासियत म्हणजे त्यावरील डिझाइन कर्नाटकातील संस्कृतीशी संबंधित असते.
पंजाबी लाल चुडा आणि त्यामध्ये पांढर्या बांगड्या नव्या नवरीला घालायला देतात. लग्नाआधी या बांगड्या घातल्या जातात. नव्या आयुष्याची सुरवात आहे असे तिला सांगितले जाते.
मस्त रंगीबेरंगी छान भरगच्च बांगड्या म्हणजे गुजराती चुडलो. लग्नात महिला हा चुडा भरतात. बांगड्यांवर छान डिझाइन असते आणि बहुरंगी चुडा असतो.
बिहारमध्ये गडद रंगाच्या लाहठी किंवा लाख की चुडीया लग्नात घातल्या जातात. या बांगड्या लाख नावाच्या एका गोष्टीच्या केल्या जातात.
केरळमध्ये नवरी साधी सुंदर तयार होते आणि हातात ओट्टावला किंवा थंडावल्ला नावाच्या बांगड्या घालते. त्या बांगड्या एकदा घातल्या की कायम घालाव्यात अशी मान्यता आहे.
आसामात गामखारु नावाची पारंपरिक बांगडी नवरीला घालतात. मुलगी विवाहित आहे असा त्या बांगडीचा अर्थ आहे. या बांगड्या फार सुंदर असतात.