आजचे राशीभविष्य: घरातून चांगली बातमी मिळेल

२२ एप्रिल २०२५: कसा असेल तुमचा आजचा दिवस? काय सांगते तुमची राशी?

कामाच्या ठिकाणी महत्वाच्या मुद्दया संबंधी वरिष्ठांशी विचार - विनिमय होतील. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास करावा लागेल.

व्यापार्‍यांना व्यापारात धनलाभ होईल. नवे बेत हाती घ्याल. दूरचे प्रवास होतील. एखाद्या विषयात प्रगती होईल. संततीची प्रगती होईल.

आजारपणात नवीन उपचारास सुरवात न केल्यास उत्तम. आज खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. घरात किंवा कार्यालयात वाणीवर ताबा ठेवा.

मौज - मजेची साधने, उत्तम दागीने व वाहन खरेदी होईल. मौज - मस्ती व मनोरंजनात वेळ खर्च होईल. तसेच भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास आपणास सुखद अनुभव देईल. 

दैनिक कामात अडथळे येतील. शत्रू व प्रतिस्पर्ध्यांमुळे त्रास होईल. वरिष्ठांशी वाद संभवतात. स्त्रियांना माहेरहून एखादी अप्रिय बातमी मिळण्याची शक्यता आहे.

मन विचलीत होईल. पोटाच्या तक्रारीमुळे यातना होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येतील. अचानक खर्च उदभवतील.

माता व स्त्री वर्गाची चिंता राहील. आज शक्यतो प्रवास स्थगित ठेवा. वेळेवर भोजन व पुरेशी झोप न मिळाल्याने शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल.

नवीन कार्याचा आरंभ करू शकाल. सहकार्‍यांकडून सौख्य व आनंद मिळेल. मित्र व नातलगांची भेट होईल. कोणत्याही कामात आज यश मिळेल. आर्थिक फायदा होईल.

मानसिक चंचलता व द्विधा मनःस्थिती ह्यामुळे महत्वाचे निर्णय आज आपण घेऊ शकणार नाही. कामात अपेक्षित यश मिळणार नाही.

नोकरी - व्यवसायात आपली प्रतिष्ठा वाढेल. पदोन्नती संभवते. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. शारीरिक दुखापतीची शक्यता असल्याने सांभाळून राहा.

मानसिक एकाग्रता राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करावी.

मित्र व वडीलधार्‍यांशी संपर्क साधू शकाल. एखाद्या रम्य स्थळी सहलीचे नियोजन कराल. नवे स्नेह - संबंध जुळतील व भविष्यात त्याच्यांकडून लाभ होईल.

Click Here