कानाचे हे छिद्र पुन्हा पहिल्यासारखे करण्यासाठी काही सोपे पण घरगुती उपाय पाहूयात.
बरेचदा जड झुमके, कानातले किंवा हेव्ही हँगिंग ईयररिंग्स वापरल्याने कानाचं छिद्र ओढलं जातं आणि हळूहळू ते छिद्र मोठं आणि पातळ होतं.
हळदीतील अँटी इंफ्लेमेटरी व मोहरीच्या तेलातील जखम भरून काढण्याच्या गुणधर्मामुळे, मोहरीच्या तेलात हळद मिसळून लावावी.
खोबरेल तेलाच्या मदतीने आपण कानाचे छिद्र मोठं आणि पातळ होण्यापासून बचाव करु शकतो.
खोबरेल तेलात कपूर मिसळून या मिश्रणाने मसाज केल्यास कानाच्या छिद्रांची जखम लगेच बरी होण्यास मदत मिळते.
टी ट्री ऑईलमध्ये अँटी इंफ्लेमेटरी व अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात, यामुळे कानाच्या छिद्रांची जखम लगेच भरुन येते.
कानाच्या छिद्राजवळ थंड पाणी किंवा बर्फ लावल्याने सूज कमी होऊ शकते. या उपायामुळे लगेच आराम मिळू शकतो.
कडुलिंबाच्या पानांची पेस्ट करून कानाच्या छिद्रांवर लावल्यास जखम लगेच बरी होते.
कानाच्या छिद्रांजवळ होणारी वेदना व सूज कमी करण्यासाठी एलोवेरा जेल लावणे फायदेशीर ठरते.