ऑक्सिजनचा उत्तम स्त्रोत आहेत ही काही झाडे. पाहा कोणती. घराजवळ असतील तर वातावरण राहते प्रसन्न.
घराजवळ झाड असावं. फक्त सावलीसाठी नाही किंवा पाना फुलांसाठी नाही तर झाड आपल्याला ऑक्सिजन देते.
काही अशी झाडे आहेत जे भरपूर प्रमाणात ऑक्सिजन देतात. ही झाडे आजूबाजूला असल्यावर वातावरण एकदम प्रसन्न राहते.
पिंपळाच्या झाडाबद्दल भरपूर मान्यता भारतात आहेत. चांगल्या वाईट दोन्ही. मात्र पिंपळाचे झाड ऑक्सिजनचा मोठा स्त्रोत आहे.
कडूलिंबाचे झाड अत्यंत औषधी असते. मात्र ते फक्त औषधीच नाही तर वातावरणासाठीही पूरक आहे. सजीवांसाठी फार उपयुक्त आहे. भरपूर ऑक्सिजन देते.
अशोकाची फुले फार सुवासिक असतात. त्याची पानेही वापरली जातात. अशोकाच्या झाडाजवळ फक्त वासच छान येत नाही तर ऑक्सिजनही खुप मिळतो.
रोजच्या जेवणात आपण कडीपत्ता वापरतो. कडीपत्ता घराजवळ असेल तर तो सभोवतालच्या हवेची गुणवत्ता सुधारतो.
आवडीने खाल्या जाणाऱ्या फळांपैकी एक म्हणजे जांभूळ. जांभळाच्या झाडामुळे हवा स्वच्छ होते. भरपूर ऑक्सिजन मिळतो.
घराच्या खिडक्या-बाल्कनीत कबुतरांचा उच्छाद? कुंडीत लावा ६ रोपं - कबुतर फिरकणार देखील नाही...