भरपूर फायबर असलेले ६ पदार्थ, पोट साफ रोजच्यारोज

या चविष्ट पदार्थांत असते भरपूर फायबर.  चवही आणि पोषणही. 

शरीरातील फायबरचे प्रमाण जर कमी झाले तर अनेक त्रास होतात. पचनासाठी फायबर फार महत्वाचे असते. 

फायबर वाढवण्यासाठी काही चविष्ट पदार्थ खाणे फायद्याचे ठरते. त्यामुळे आहारात या ६ पदार्थांचा समावेश करा, फायबरही वाढेल आणि जिभेलाही आनंद. 

फार आवडीने खाल्ली जाणारी भाजी म्हणजे राजमा. राजमा खाल्याने भरपूर प्रमाणात फायबरर्स मिळतात. 

भारतात फार लोकप्रिय असलेला पदार्थ म्हणजे छोले. हे छोले चवीला मस्त असतात तसेच छोले शरीरातील फायबर वाढवतात. 

चवळीची भाजी घरोघरी केली जाते. चवळीची भाजी अनेक प्रकारे करता येते. आरोग्यासाठी चवळी फायद्याची ठरते. 

नाचणी हा पदार्थ सर्वच बाबतीच पौष्टिक ठरतो. त्यामुळे आहारात नाचणीची भाकरी, लाडू आणि इतरही पदार्थ असावेत. 

भेंडीची भाजी लहान मुलांनाही फार आवडते.  त्यामुळे छान परतलेली साधी भेंडीची भाजी नक्की करा. आरोग्यासाठी फायद्याची असते.

गोडसर असे केशरी गाजर शरीरातील फायबर्स वाढवते. त्यामुळे आहारात गाजराचा समावेश असायला हवा.

Click Here