वजन कमी करण्यासाठी आहारात असावी ही फळे. आरोग्यासाठी फायद्याची आणि पचनासाठी चांगली.
वजन कमी करण्यासाठी फळे खाणे नक्कीच फायद्याचे आहे. मात्र सगळीच फळे वजन नियंत्रणात ठेवत नाहीत. काही ठराविकच फायद्याची ठरतात.
जसे की सफरचंद. सफरचंद पोटभरीचे होते आरोग्यासाठी चांगले असते आणि वजन कमी करण्यासाठी फायद्याचे ठरते.
कलिंगड चवीला मस्त आणि गोड असते. मात्र त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे कलिंगड वजन वाढवत नाही.
पोषणसत्वांनी परिपूर्ण असलेला पेरु डाएटमध्ये नक्की असावा. इतर फळांच्या तुलनेत त्यात साखरही कमी असते.
फायबर, अँटी ऑक्सिडंट्स आणि पाण्याने भरलेल्या बेरीज नक्की खा. पोटासाठी आरामदायी असतात.
संत्री आरोग्यासाठी फायद्याची असतात. त्यात जीवनसत्त्व सी भरपूर असते. फायबरही भरपूर असते.
फायबरसाठी पेर आहारात असावे. तसेच पेर पोटभरीचे असते. त्यामुळे एक खाल्ले तरी भुकेवर नियंत्रण राहते.