पोटासाठी आरामदायी ठरतात ही ५ फळे. आहारात नक्कीच असावी.
पोटाच्या आरोग्यासाठी काही फळे फारच उपयोगी ठरतात. ती पचन सुधारतात, आम्लपित्त कमी करतात आणि पोटाला थंडावा देतात.
केळी हे पचनासाठी हलके आणि सौम्य फळ आहे. यात फायबर भरपूर असल्यामुळे बद्धकोष्ठता कमी होते आणि पोटातील आम्लपित्त शांत होते. अतिसार झाल्यावरही केळी पोटाला स्थिरता देते.
सफरचंदात पेक्टिन नावाचे फायबर असते, जे पचन सुधारते आणि आतड्यांची स्वच्छता करते. गॅस, जडपणा आणि पोट फुगणे यावर सफरचंद उपयोगी ठरते.
पपईमध्ये पॅपेन हे एन्झाइम असते, जे अन्न पचायला मदत करते. बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचनाच्या तक्रारींमध्ये पपई पोटाला लगेच आराम देते.
डाळिंब पोटातील दाह कमी करते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते. अतिसार, आमांश किंवा अशक्तपणा झाल्यावर डाळिंब खाल्ल्याने पोटाला शांतता मिळते.
पेरूमध्ये फायबर भरपूर असल्यामुळे पोट साफ राहण्यास मदत होते. पचन सुधारते आणि पोटात साचलेला गॅस कमी होतो. मात्र पेरू नेहमी पिकलेला आणि मर्यादित प्रमाणात खावा.