रिझर्व्ह बँकेकडे तब्बल ८८० टन सोने!

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सुवर्णसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेचा सुवर्णसाठा सतत वाढत असून, सप्टेंबर २०२५ अखेर तो ८८०.१८ टनांवर पोहोचला आहे. 

मागील १२ महिन्यांत म्हणजेच सप्टेंबर २०२४ च्या तुलनेत या साठ्यात २५.४५ टनांची वाढ झाली आहे, असे आरबीआयच्या अहवालातून समोर आले आहे. 

सप्टेंबर २०२४ अखेर आरबीआयकडे ८५४.७३ टन सोने होते, तर २०२५ च्या पहिल्या सहामाहीअखेर हा आकडा वाढून ८८०.१८ टनांवर पोहोचला आहे. 

५७५.८२ टन सोने देशांतर्गत साठवलेले आहे, तर उर्वरित २९०.३७ टन सोने बँक ऑफ इंग्लंडकडे आहे. 

याशिवाय बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स या परदेशी संस्थांकडे सोने सुरक्षित ठेवण्यात आले आहे. तसेच, १३.९९ टन सोने जमा स्वरूपात ठेवले आहे.

अजगर किती वेगाने सरपटू शकतो? माहित्येय? जाणून घ्या...

Click Here