'या' गावात जन्मतात सर्वाधिक जुळी मुलं!

भारतातील एक रहस्यमय गाव, जेथे फक्त जुळी मुलेच जन्मतात

केरळमधील कोडिन्ही गावाला जुळ्या मुलांचे गाव म्हणूनही ओळखले जाते.

अनेक शास्त्रज्ञांनी या गावाचा अभ्यास केला आहे. परंतु, त्यांना अद्याप त्यामागील खरे कारण उलगडलेले नाही.

केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यात असलेल्या २००० लोकसंख्येच्या कोडिन्ही या छोट्याशा गावात जुळ्या मुलांचा जन्म असामान्यपणे जास्त आहे.

या गावातील जवळजवळ प्रत्येक घरात जुळ्या मुलांची किमान एक जोडी असते.

भारतात सरासरी जन्मदर १००० जन्मांमागे ८ ते ९ आहे, तर कोडिन्हीमध्ये हा दर ४२ ते ४५ पर्यंत वाढतो.

२००८ मध्ये, या गावात अंदाजे २८० जुळे मुले होते. यापैकी बरीच मुले १५ वर्षांपेक्षा कमी वयाची होती. त्याच वेळी, ८० जुळे त्या वेळी गावातील शाळेत जात होते.

अनेकदा संशोधन झाले. मात्र गावात जुळी मुलेच जन्माला का येतात? हे कोडे अजून उलगडलेले नाही.

भाग्यश्रीने नवरात्रीनिमित्त केलं खास फोटोशूट

Click Here