चहासोबत खा हे पदार्थ . चवीला मस्त आणि नक्कीच आवडतील. पाहा कोणते आहेत.
सकाळी कधी फार घाई झाली की आपण फक्त चहा पिऊन बाहेर पडतो. मग दुपारपर्यंत पोटात काही नाही.
कधी नाश्ता करायला वेळ नाही मिळाला घाई झाली की पटकन दोन घास पोटात जावे यासाठी चहा सोबत आपण बिस्कीट खातो. मात्र पोटासाठी ते चांगले नाही.
भारतात बेकरी प्रॉडक्ट्स वर्षानुवर्षे खाल्ले जात आहेत. चहात बुडवून खाता येण्यासारखे काही पदार्थ पाहा.
कुरकुरीत खारी आणि चहा हे मस्त कॉम्बिनेशन आहे. नक्की खावे. खारी पचायलाही हलकी असते.
टोस्ट अनेक प्रकारचे मिळतात. शिवाय दोन टोस्ट खाल्ले तरी पोटभरीचे होतात. त्यामुळे सकाळी चहा टोस्ट खाणे हा चांगला पर्याय आहे.
लहान गोल गोल असे बटर ज्याला सुरती बटर असे म्हटले जाते, हे गावागावांतून आवडीने खाल्ले जातात. चहा व बटर मस्त जोडी आहे.
विविध प्रकराच्या नानकटाई बेकरीत मिळतात. छान गोड अशी नानकटाई चहा कॉफीसोबत छान लागते.
चहा आणि परतलेला ब्रेड अनेक जण खातात. नाश्त्यासाठी कधी काही करायला वेळ नसेल तर पटकन दोन ब्रेड परतायचे आणि चहासोबत खायचे.