चटणीला फोडणी दिल्यावर चटणीची चव जास्त छान लागते. सगळ्याच चटण्यांना देता येईल अशी ही फोडणी करायला अगदीच सोपी आहे.
ताटात छान चविष्ट चटणी असेल तर जेवणाची मज्जा दुप्पट होते. इडली असेल किंवा डोसा त्या सोबत चटणी तर हवीच.
चटणी विविध प्रकारची असते. नारळाची, शेंगदाण्याची, टोमॅटोची अशा विविध चटण्या करता येतात.
कढईत तेल घ्या. जरा तेल तापल्यावर त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडू द्या.
मोहरी तडतडल्या त्यात जिरे घाला आणि जिरे फुलू द्या.
फोडणीत कडीपत्ता घाला. कडीपत्त्यामुळे चटणी खमंग होते.
काश्मीरी लाल मिरचीचे तुकडे फोडणीत घाला .
चमचाभर हिंग त्यात घाला. हिंगामुळे वासही छान येतो आणि चवही मस्त येते.
शेवटी अगदी दोन दाणे साखर घाला. लाल मिरचीमुळे त्रास होऊ नये म्हणून साखर घालायची.