साडीची योग्य निवड केली, तर उंच व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक आणि सुंदर दिसते.
उंच बांध्याच्या महिलांना साडी नेसताना अनेकदा प्रश्न पडतो की कोणता प्रकार, रंग किंवा डिझाईन त्यांना अधिक शोभून दिसेल.
साडीचे फॅब्रिक, प्रिंट्स, बॉर्डरची रुंदी आणि रंग यांचा योग्य विचार करणे गरजेचे असते.
उंच महिलांनी कोणत्या प्रकारच्या साड्यांची निवड करावी, जेणेकरून त्यांचा लूक परफेक्ट आणि स्टायलिश दिसेल, ते पाहा
कॉटनच्या साड्या या उंच महिलांना अधिकच सुंदर व देखण्या दिसतात. या साड्या अंगावर व्यवस्थित बसतात आणि उठून दिसतात.
स्ट्रेट लाईन पॅटर्न साडी, या पॅटर्नमधील लाईन डिझाईन्समुळे आपली उंची अधिकच सुंदर आणि उठावदार दिसण्यास मदत होते.
फ्लोरल पॅटर्न सध्या ट्रेंडिंग असल्याने, साडीवरील फ्लोरल डिझाईन्स उंच बांध्याच्या महिलांवर अधिकच शोभून दिसतात.
जॉर्जेट साड्यांचे कापड मऊमुलायम व अंगावर अगदी परफेक्ट बसणारे असते, त्यामुळेच अशा प्रकारच्या साड्यांमध्ये उंची अधिक आकर्षक दिसते.
सॅटिनच्या हलक्या - फुलक्या पण रॉयल लूक देण्याऱ्या साड्या उंच बांध्याच्या महिलांवर फारच छान दिसतात.
साडीत ग्लॅमरस लूक हवा असेल तर अशा प्रकारची रफल साडी देखील नक्की ट्राय करु शकता. या साड्या फारच ट्रेंडिंगमध्ये आहेत.