'अशी ही बनवाबनवी'मधील जगप्रसिद्ध डायलॉगमागची खरी गोष्ट
'अशी ही बनवाबनवी' या सिनेमाचे एकापेक्षा एक भन्नाट डायलॉग चित्रपटवेड्यांना तोंडपाठ आहेत.
कितीही वेळा सिनेमा बघा, 'धनंजय माने इथेच राहतात का?', हा सीन प्रत्येक वेळी खळखळून हसवतोच.
त्यातलं डायबिटीसचं औषध, इस्रायल आणि सत्तर रुपये हे 'गणित' म्हणजे हास्याची 'बेरीज'च.
पण, बऱ्याच जणांना ठाऊक नाही की, इस्रायल, डायबिटीस आणि 70 रुपयांचा संदर्भ कल्पनेतला नव्हता, तर सत्यातला होता.
सिनेमाचे लेखक वसंत सबनीस यांना डायबिटीस होता आणि त्यांचा एक मित्र त्यांना इस्रायलमधील औषधाबद्दल बोलला होता
इतकंच नव्हे तर, सबनीसांनी ७० रुपयांचं हे औषध मागवलंही होतं, असा किस्सा सचिन पिळगावकरांनी सांगितला.
आता हे औषध मधुमेहावर किती गुणकारी होतं माहीत नाही, पण सिनेमात त्यानं विनोदाची मस्त 'साखरपेरणी' केली!