स्पृहा जोशीने जांभळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केलंय.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी. आजवरच्या कारकिर्दीत स्पृहाने अनेक गाजलेल्या मालिका, नाटक आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे.
अलिकडेच स्पृहाने एक फोटोशूट केलं आहे. त्यातील काही निवडक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोत तिने जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे. त्यावर पांढऱ्या रंगाचा लाँग स्लीव्हजचा ब्लाउज परिधान केलाय.
स्पृहाने केसांचा बन बांधला असून कानात सिल्व्हर इअररिंग्स परिधान केले आहेत.
या फोटोमध्ये स्पृहा जोशी कमालीची सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.