अभिनेत्रीने नुकतेच लखनवी ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
स्पृहा जोशी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नायिका आहे.
आजवर तिने वेगवेगळे मराठी सिनेमे, नाटक तसेच मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
अलिकडेच स्पृहा जोशी कलर्स मराठीवरील 'सुख कळले' या मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली.
नुकतेच स्पृहा जोशीने पर्पल रंगाच्या लखनवी ड्रेसमध्ये फोटोशूट केलंय. या फोटोशूटमध्ये तिने गळ्यात सिल्व्हर रंगाचे दागिने परिधान केलेत. तिने एथनिक ड्रेसवर केस मोकळे सोडले आहेत.
स्पृहा जोशी एथनिक ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसतेय.