अभिनेत्रीचे लेटेस्ट फोटो पाहून चाहते हैराण झाले आहेत.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती मराठी इंडस्ट्रीतील अप्सरा म्हणून ओळखली जाते.
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावरील पोस्टमुळे सातत्याने चर्चेत येत असते.
नुकतेच सोनालीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. जे पाहून चाहते हैराण झाले आहेत.
या फोटोत सोनाली जादूटोणा करताना दिसते आहे. तिने हिरव्या रंगाची साडी नेसलीय. कपाळावर मोठं कुंकू लावलंय. केस मोकळे सोडलेत.
या फोटोत सोनालीचा भयावह अवतार पाहायला मिळतो आहे. हे फोटो पाहून चाहते गोंधळून गेले आहेत.
खरेतर सोनालीचा हा लूक तिचा आगामी सिनेमा जारणमधला आहे. तिने हा लूक शेअर करत चित्रपटासंदर्भातील पोस्ट शेअर केली आहे.
सोनालीचे हे फोटो चांगलेच चर्चेत आले आहेत.