स्नेक प्लांट घरात लावण्यासाठी एकदम परफेक्ट, कारण ....

घरात लावण्यासाठी उत्तम असे रोप म्हणजे स्नेक प्लांट . कारण आहेत अनेक. 

घरात ठेवण्यासाठी चांगले आणि सुंदर असे झाड म्हणजे स्नेक प्लांट. घराची शोभा वाढवते आणि वातावरणही सुधारते. 

भेटवस्तू म्हणून देण्यासाठी स्नेक प्लांट एकदम मस्त ठरते कारण ते सांभाळायला तसे सोपे असते. त्याची काळजी घेण्यासाठी फार काही करावं लागत नाही. 

हे झाड घरातील वातावरण चांगले ठेवण्यासाठी चांगले आहे. हवा शुद्धिकरणासाठी फार चांगले मानले जाते. 

कमी उजेडातही चांगले वाढते. त्यासाठी भरपूर ऊन हवेच असे नाही. त्यामुळे सगळ्या ऋतुंमध्ये हिरवेगार राहते. 

एखादा दिवस पाणी द्यायला विसरलात अगदी काही दिवस पाणी दिलं नाही तरी ते मरणार नाही. कमी पाण्यावरही ते जगतं. 

रोपाचं एक पान कापा आणि दुसर्‍या कुंडीत लावा लगेच त्याला बहर येतो. त्यामुळे दुसरे रोप लावणे कठीण जात नाही. 

Click Here