कार्तिकी गायकवाडचा मराठमोळा साज

गायिकेचे लेटेस्ट फोटो चर्चेत आलेत. 

कार्तिकी गायकवाड ही एक लोकप्रिय मराठी गायिका आहे. 

कार्तिकी 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाची विजेती होती. या कार्यक्रमानंतर तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली.

कार्तिकीचे वडील पंडित कल्याणजी गायकवाड, जे स्वतः एक गायक आणि संगीतकार आहेत. त्यांनी तिला गायनाचे धडे दिले.

'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' जिंकल्यानंतर कार्तिकीने अनेक मराठी गाणी गायली आहेत.

तिने काही मालिकांसाठी शीर्षकगीतेही गायली आहेत. 

'गजर कीर्तनाचा' या कार्यक्रमाची ती निवेदिकाही होती. ती लाइव्ह शोमध्येही गाते.

कार्तिकी सोशल मीडियावर सक्रीय आहे. नुकतेच तिने साडीतले फोटोशूट शेअर केले आहेत.

कार्तिकीने पिवळ्या रंगाची साडी नेसलीय. नाकात नथ, गळ्यात हेवी नेकलेस घातला आहे.

या फोटोशूटमध्ये कार्तिकी खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते. 

Click Here