तांब्याची भांडी ५ मिनिटांत होतील चकाचक- बघा उपाय 

तांब्याची भांडी स्वच्छ करणं अवघड वाटत असेल तर हा उपाय बघाच.. 

घरामध्ये असणारे तांब्याचे भांडे, तांब्याचे दिवे किंवा पूजेचे इतर साहित्य काही दिवसांतच काळपट होऊन जातात. 

ते स्वच्छ करणे हे अनेकांना खूप वेळखाऊ आणि अवघड काम वाटतं. तेच काम आता अगदी सोप्पं कसं करायचं ते पाहुया.. 

तांब्याचे भांडे स्वच्छ करण्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीमध्ये गव्हाचे पीठ घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा हळद घाला. 

त्यामध्ये लिंबाचा रस टाकून त्याची पेस्ट बनवून घ्या. आता ही पेस्ट तांब्याच्या भांड्याला लावा. 

२ ते ३ मिनिटे ही पेस्ट भांड्यावर तशीच राहू द्या आणि त्यानंतर घासणीने भांडी घासून काढा. 

त्यानंतर कोमट पाण्यात तांब्याची भांडी धुवून घ्या. तुम्हाला भांडी अगदी नव्यासारखी लख्खं झालेली दिसतील. 

Click Here