silent heart attack: 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष कराल तर गाठाल हॉस्पिटल

सायलेंट हार्ट ॲटॅक आहे घातक; जाणून घ्या त्याची महत्त्वाची लक्षणं

बदलत्या जीवनशैलीमुळे आज प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या शारीरिक व्याधींना सामोरं जावं लागत आहे. 

सध्या अनेक जण चुकीचा आहार आणि बदलती लाइफस्टाइल यामुळे सायलेंट हार्ट ॲटॅकचे बळी पडत आहेत. अॅटॅकची नेमकी लक्षण कोणती ते पाहुयात.

थकवा- शारीरिक काम किंवा धावपळ न करताही जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर वेळीच सावध व्हा. सायलेंट हार्ट ॲटॅकचं हे महत्त्वाचं लक्षण आहे.

सायलेंट ॲटॅकच्या लक्षणांमध्ये श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे हे सुद्धा महत्त्वाचं लक्षण मानलं जातं.

पोटदुखी झाल्यावर पचनासंबंधी तक्रार असल्याचं समजून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र हे सुद्धा हार्टसंबंधित समस्या असण्याचं एक लक्षण असू शकतं.

घाम येणे- सतत घाम येणे हे हार्ट ॲटॅकच्या सुरुवातचं महत्त्वाचं लक्षण मानलं जातं.

चक्कर येणे - सतत चक्कर येत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे सुद्धा सायलेंट हार्ट ॲटॅकच्या लक्षणांपैकी एक लक्षण आहे.

किडनी स्टोनची समस्या आहे? 'ही' भाजी टाळा

Click Here