शरीराला पाण्याची गरज असल्याची ही ५ लक्षणे ओळखायला चुकू नका. उन्हाळ्यात सगळ्यांनाच हा त्रास होतो.
डिहायड्रेशन होण्याचे सगळ्यात साधे आणि सामान्य लक्षण म्हणजे सतत तहान लागणे. शरीरातील पाणी कमी झाल्याचे साधे लक्षण.
डिहायड्रेशन होत असेल तर आधी ओठ सुकतात, तोंड कोरडे पडते आणि ओठ फुटायला लागतात.
लघवीचा रंग बदलतो. नेहमीपेक्षा गडद व्हायला लागतो. अगदी सामान्य लक्षण आहे.
थकवा येतो आणि अशक्तपणा जाणवतो. शरीरातील ऊर्जा कमी व्हायला लागते. लगेच थकवा जाणवतो.
त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसायला लागते. शरीरात पाणी कमी झाले की लगेच त्वचेवर दिसून येते.